Wednesday, March 20, 2013

देवदास

आज अचानक तुझा फोटो पहिला ...
आणि वाटला व्हावा कवी .....
पुसट स्मृतींना द्यावा उजाळा
करावी एक कविता नवी !!!
 
ओठांवरती विरलेल्या ,डोळ्यात खोलवर हरवलेल्या ..
आहेत फक्त तुझ्याच काही आठवणी....
कधी जमलंच नाही ग सांगायला..
तूच असायचीस सदैव ध्यानीमनी !!!
 
स्वप्नात तू ... मनात तू...
होतीस आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात तू !!!
क्षण सरले ..स्वप्नं हरवले
मनातले रिक्त कोने तुझ्या आठवणींनी भरले !!!
 
दुःख आता अजिबात नाही ...तू जवळ नसण्याचं ..
नशीब प्रत्येकाचंच नसतं ग..आयुष्यभर हसण्याचं!!!!
 
Swap(NIL)

कालनिर्णय

बघता  बघता  कालनिर्णय  ची  रद्दी  2 किलो  झाली ...
cassette ला  गायब  करून  CD आईटित music player बरोबर  आली ...

टेस्ट  क्रिकेट  ला  आजकाल  IPL ने  दाखवलाय  ठेंगा....
Shorts च्या  जम्न्यात आजकाल  म्हणे  आजोबांनी  ही  सोडून  दिलाय  लेंगा ...

Mother's day ..Father's day...प्रत्येक  नातेवायकाचा आजकाल  असतो  एक  yearly  day
रोज  रोजची  नको  ती नात्यांची  कटकट  ..एकदाच  की  ते मागून  घे ...

सकाळी  7 वाजता  अंगणात  आणि  tv वर  चालू  असायची  रंगोली
हिमेश  च्या  जमान्यात   आता  मात्र चालू  असतो सतत  चा  शिमगा  आणि  संगीताची  होळी...

रविवार  सकाळचा  ते  रामायण  आणि  मोगली  च ते  junglebook
आजकाल  मात्र  डोळे  वटारून  insaaf करतना  राखीच   देते  शेरखान  सारखा  look ...

साला   बघता  बघता  कालनिर्णय  ची  रद्दी  2 किलो  झाली ..
तिशी  जवळ  आली  आणि  काका  मामा एवढाच आयकायची सवय झाली....
 
वाटला  एकदा  परत  फिरवावीत  ती  कालनिर्णयची  पानं..
पुन्हा  अनुभवावं  ते  आयुष्याचं  बेधुंद  गाणं...

परत  मांडावेत  ते  उन्हाळच्या  सुट्टीतले  पत्यांचे  डाव
बघत  बसावे  Pu La चं  असा  मी   असा मी  आणि  अनुभवावे  बाबूजींचे गाण्यातले भाव ..

पण  काय   करणार  outlook कॅलेंडर  खूप  busy आहे ..
snooze च button  असलं तरी  तासाला  एक  reminder आहे ...