आज अचानक तुझा फोटो पहिला ...
आणि वाटला व्हावा कवी .....
पुसट स्मृतींना द्यावा उजाळा
करावी एक कविता नवी !!!
ओठांवरती विरलेल्या ,डोळ्यात खोलवर हरवलेल्या ..
आहेत फक्त तुझ्याच काही आठवणी....
कधी जमलंच नाही ग सांगायला..
तूच असायचीस सदैव ध्यानीमनी !!!
स्वप्नात तू ... मनात तू...
होतीस आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात तू !!!
क्षण सरले ..स्वप्नं हरवले
मनातले रिक्त कोने तुझ्या आठवणींनी भरले !!!
दुःख आता अजिबात नाही ...तू जवळ नसण्याचं ..
नशीब प्रत्येकाचंच नसतं ग..आयुष्यभर हसण्याचं!!!!
Swap(NIL)
No comments:
Post a Comment